ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे तर उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. यात युवासेना जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे तर युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकारी यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना वाढविण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी पक्ष संघटनेसाठी आहोरत्र झटत असणारे विनोद रोकडे यांची युवासेना जिल्हा संघटक पदी तर युवासेना उपजिल्हा प्रमुख पदी हेमंत महाजन यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुखपदी सतीश बोरसे, रणजित सिकरवार, सोपान महाजन, कार्यालय प्रमुखपदी गोपाल पाटील यांची निवड करण्यात आली.

निवड प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव लोकसभाचे खा. उन्मेष पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, जळगाव लोकसभाचे उमेदवार करण पवार, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी मा नगरसेवक जितेंद्र धनगर किरण मराठे युवासेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन लक्ष्मण महाजन यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित युवासेना जिल्हा संघटक विनोद रोकडे यांनी स्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी ची आठवण करून दिली बाळासाहेब ठाकरे यांनी जात पात न पाहता युवा वर्गाला संधी देण्याचे तेच विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत पक्षांनी दिलेले जबादारी योग्य प्रकारे पार पडेल असे पत्रकार शी बोलताना व्यक्त केले.

Protected Content