धक्कादायक : बेपत्ता झालेल्या तरूणाचा निर्घृण खून; शेतात आढळला होता सांगळा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस् न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील बाविस वर्षीय तरूणाचा निर्घृण खून करीत मृतदेह शेतात फेकल्याची घटना रविवार, ५ मे रोजी सकाळी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे मृतदेह अत्यंत कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. मयताची ओळख पटली असून तो गेल्या आठवड्यापासून बेपत्ता झाला होता.

 

 

रोहित दिलीप कोपरेकर (वय-२२) रा. भुसावळ असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.  अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू आहे.

 

शहरातील वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे अज्ञात इसमाच्या मृतदेहाचा सांगाडा पडून असल्याची माहिती रविवारी ५ जून रोजी सकाळी समोर आले आहेत. याबाबत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली. अंगावरील कपडे, रक्ताचे नमूने डीएनए चाचणी आणि मिसींग दाखल माहितीनुसार मयताची ओळख पटविण्यात आली. रोहित हा ३० जून पासून बेपत्ता झाला होता. याबत २ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली होती.   रोहित हा एका दुकानात कामाला होता तर त्याला वडिल नसून घरी आई, बहिण असल्याचे सूत्रांनी सांगितले. मृतदेहाजवळ काही अंतरावर रक्ताने माखलेले दगड सुध्दा आढळून आला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!