Accident : पिंपळखुटा येथे कोसळला समृद्धी महामार्गाचा पूल

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात भव्य पुलाचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, काम सुरू असताना अचानक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, सर्व मजूर जेवायला गेल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील जात असून सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा या परिसरात भव्य पुलाचे बांधकाम सुरू आहे. काम सुरु असताना या पूलाचा गर्डर खाली कोसळला. जेवणाची सुट्टी झाली असताना सर्व कर्मचारी दुसरीकडे गेले होते. यावेळी अचानक या पुलाचा काही भाग कोसळला आणि या पुलाखाली असलेल्या मोठ्या ट्रेलरवर पडला, त्यामध्ये ट्रेलर्स पूर्णपणे तुटला असून हा पूल कोसळताना सर्व मजूर जेवत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अन्यथा तडेगाव सारखी मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती. समृद्धी महामार्गाची एवढे मोठे भव्यदिव्य काम सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चुकीचे असून समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदारांनी अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. तसेच राज्य शासनाने देखील या महामार्गावरील पुलाचे तसेच इतर रस्त्याचे चांगल्या प्रकारे ऑडिट करून नंतरच पूल सुरू करावा,  अन्यथा या रस्त्यावर अशाप्रकारे घटना घडल्याशिवाय राहणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!