खोके सरकार राज्यात आल्यापासून पनवती सुरू झाली- उध्दव ठाकरे

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर व महाविकास आघाडी चे सरकार पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिलीच मुंबईबाहेर जाहीर सभा बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी संवादच्या माध्यमातून पार पडली .यावेळी त्यांनी स्थानिक उद्यापासून तर सध्या राज्यात घडत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर निशाणा साधला.

कर्नाटक प्रश्नावर त्यांनी पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर कर्नाटकात गेल्यानंतर माझा पंढरपूरचा विठोबाही कर्नाटकात जाणार. लाखो कोट्यवधी भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटकात जाणार. महाराष्ट्रातलं दैवत पंढरपूर, अक्कलकोट पळवणार असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुवाहाटीला जायची गरज भासली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊच दिली नसती. शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. डोकं आपटावं लागेल पण माझी शिवसेना तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका लांबवतायेत. मी तुमच्या भरवशावर उभा आहे. तुमच्या संकटात मी उभा आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही. आपण शिवरायांचे नाव घेतो मग शिवरायांनी आपल्याला लढायचं शिकवलंय असं त्यांनी म्हटलं.

यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार ,राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या देखील तोप डागली. राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला. अब्दुल गटार, त्याने सुप्रिया सुळेचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर कुठल्याही महिलेचा अपमान झाला असता तर लाथ मारून हाकलवून दिला असता. जसा एकाला हाकलला. महिलेचा अपमान झाला हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात जे चाललंय ते पसंत नाही आज आम्ही सरकारमधून बाहेर पडतोय हे जाहीर करा. स्वत:वर विश्वास नाही म्हणून गुवाहाटीला जाता असंही उद्धव ठाकरे म्हणाले. विदर्भातल्या या पहिल्या दौऱ्याला उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी संवाद मिळाला चांगला प्रतिसाद लाभला विदर्भातील प्रामुख्याने अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या विभागातील गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने चिखलीत सकाळपासून दाखल झाले होते.

Protected Content