अंशता अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचा दहावी व बारावी बोर्डाच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातील व राज्यातील अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा यांनी दहावी व बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी वर बहिष्कार टाकला आहे. राज्यातील अंशता प्राथमिक, माध्यमिक ,उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यातील २०%,४०%,६०% शिक्षक बांधव यांचे १००% अनुदानासाठी गेली ६१दिवसापासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु असून या बाबद अजून शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नही. त्याचबरोबर हिवाळी व नुकत्याच झालेल्या बजेट अधिवेशनात सुद्धा या विषयाबाबद चर्चा सुद्धा झाली नाही. शिक्षणमंत्री यांनी गेल्यावर्षी दिवाळीमध्ये आझाद मैदानावर येऊन या शाळा, महाविद्यालय यांना अनुदानाचा वाढीव टप्पा हा १ जानेवारी २०२४ पासून देण्यात येईल असे आश्वासित केले होते. परंतु त्यावर आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे चालू आर्थिक अधिवेशनात या शिक्षक वर्गाला त्यांच्या हक्काचे पगार मिळावे व त्यांना वाढीव टप्पा अनुदान प्रचलित नियमानुसार १०० अनुदान हे १ जानेवारी २०२४ पासून देण्यात यावा ह्या मुख्य मागणीसाठी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील ६३ हजार शिक्षक बांधव यांनी इयत्ता बारावी व दहावी बोर्ड पेपर परीक्षा तपासणी वर बहिष्कार टाकला आहे. त्याप्रकारचे निवेदन आपापल्या कॉलेजचे प्राचार्य, जिल्ह्यातील विविध तालुक्याचे तहसीलदार, शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव यांना देण्यात आले आहे.
जोपर्यंत १००% अनुदान देण्यात येत नाही तोपर्यंत हा बहिष्कार मागे घेण्यात येणार नाही असे शिक्षक समन्वय संघाने राज्य सरकारला आव्हान केले आहे. निवेदन उच्च माध्यमिक कृती संघटनेचे अध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी, प्रा. राहुल कांबळे, प्रा. महेंद्र बच्छाव, प्रा. संतोष वाघ या मुख्य समन्वयकांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.यावेळी उपस्थिती जळगाव जिल्ह्यातील समन्वयक प्रा. योगेश पाटील, प्रा.सतीश पाटील,प्रा. विजय पवार, प्रा.गुलाब साळुंखे, प्रा‌ दिनेश पाटील, प्रा. राकेश अडकमोल, प्रा. शारदा चौधरी,प्रा.जमिला तडवी,यांच्यासह शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content