यावल माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सहकारी पतपेढीच्या निवडणुकीसाठी ३९ उमेदवारी अर्ज दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथील यावल तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढीचे २०२४ ते २०२९ या कालावधी साठीच्या पंचवार्षीक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
निवडणूक दरम्यान तालुक्यात खुल्या प्रवर्गाकरिता एकूण ६ गट आहे. प्रत्येक गटातून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. म्हणजे एकूण ६ उमेदवार निवडून द्यायचे असले तरी ६ जागेसाठी २२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. तालुकास्तरावर ५ उमेदवार निवडून द्यायचे आहे. अनुसूचित जाती व जमाती, एस.सी व एस.टी या प्रवर्गातून एक जागा असली तरी त्या एक जागेकरीता ४ अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच भटक्या जाती, जमाती व इतर मागास प्रवर्ग एन.टी व एस.बी.सी एक जागेकरिता ३ अर्ज प्राप्त झाले
आहे. ओबीसी एक जागेसाठी ७ अर्ज प्राप्त झाले आहे.
महिला राखीव २ जागे करिता ३ अर्ज प्राप्त झाले असून एकूण ३९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तसेच १ ते १५ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज माघारी करिता वेळ देण्यात आलेला आहे. काही उमेदवारांनी तालुक्यासह गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे काही गट बिनविरोध, महिला राखीव गट बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भटक्या जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातून सुद्धा बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. पतपेढीचे एकूण३१२ मतदार असलेल्या लहान समजल्या जाणाऱ्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीची निवडणुक बिनविरोध व्हावी व सर्व स्तरातील उमेदवाराला प्राधान्य मिळावे असे जाणकार शिक्षकांचे मत आहे,असे झाल्यास निवडणूक बिनविरोध होईल व पतपेढीचा होणारा खर्च वाचेल. निवडणूक बिनविरोध होते का निवडणुकीचा आखाडा रंगतो याच्याकडे सर्व तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Protected Content