जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | घरातून निघून गेलेल्या उत्तम काशिनाथ चव्हाण (वय ६५, रा. भोकर, ता. जळगाव) यांचा मृतदेह गिरणा नदीच्या काठावर शनिवारी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर येथे उत्तम काशिनाथ चव्हाण हे वृद्ध वास्व्यास होते. १९ जून रोजी सकाळच्या सुमारास ते घरातून कुठेतरी निघून गेले होते. सायंकाळपर्यत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा गावाजवळील जंगलात शोध घेतला. मात्र तरी देखील ते मिळून आले नाही. दरम्यान, शनिवारी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा गावाजवळील गिरणानदीच्या काठावर शोध घेत असतांना त्याठिकाणी उत्तम चव्हाण यांचा मृतदेह मिळून आला. दरम्यान, घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे पोहेकॉ किरण अगोणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.