जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सामुदायिक रेडियो मनभावन 90.8 एफ.एम. तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रिया सफळे, कांचन पाटील, जयश्री भोसले आणि निलम पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमाला मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, रेडियो मनभावनचे संचालक अमोल देशमुख, जनसंपर्क अधिकारी संदीप केदार आणि आरजे शुभांगी बडगुजर उपस्थित होते.
रेडियो मनभावन 90.8 एफ.एम. गरीब असो वा श्रीमंत, सर्वसामान्य नागरिकांच्या वेदना आणि प्रश्नांना वाचा फोडत आहे. समाजातील महत्त्वाच्या विषयांवर हा रेडियो आवाज उठवत असून, विद्यार्थ्यांना देखील रेडियोच्या माध्यमातून समाजसेवेची संधी मिळत आहे.
यावेळी प्राचार्य संजय भारंबे यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “मूळजी जेठा महाविद्यालयाचे विद्यार्थी रेडियोच्या माध्यमातून इंटर्नशिप करताना समाजासाठी आवाज बनत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे.” कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी हर्षल सुरडकर, नेहा मराठे, गौरव सोनवणे, ग्रीष्मा पाठक, साहिल गायकवाड, प्रतीक वाणी आणि अनिकेत यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रेडियो मनभावन 90.8 एफ.एम. ने महिलांच्या योगदानाचा सन्मान करत समाजातील सकारात्मक बदलांसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.