मोबाईल टॉवरच्या ठिकाणाहून सामानांची चोरी; ३९ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील जैन व्हॅली परिसरात सुरू असलेल्या मोबाईल टॉवरच्या कामाच्या ठिकाणाहून बॅटरी, सोलर केबल किट व अन्य एकूण ३९ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे उघडकीला आले होते. चौकशी अंती चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर  एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जैन व्हॅली परिसरातील गांधी तीर्थ भागात एका कंपनीच्या मोबाईल टॉवरचे काम सुरू आहे. त्या ठिकाणाहून  एकूण ३९ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले. ही चोरी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली आहे. दरम्यान चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मक्तेदार गोपीचंद नाना पाटील यांनी शनिवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे करीत आहे.

Protected Content