


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील खंडेराव नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला टॉमिने डोक्यात मारहाण करून जखमी केल्याची केल्याची घटना गुरुवारी 20 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी 21 जून रोजी रात्री 12.30 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेश एकनाथ कोळी (वय-20) रा. कोठारी नगर, जळगाव हा तरुण गुरुवारी 20 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता खंडेराव नगरातून जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून हर्षल शिंपी रा. जळगाव याने हातातील टॉमी काढून राजेश कोळी यांच्या डोक्यात टाकली. त्यामुळे तो जखमी झाला, त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी 21 जून रोजी रात्री 12.30 वाजता हर्षल शिंपी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.



