यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील विवाहित शेतमजुर तरूणाचा विहीरीत तोल जावून पाण्यात बुडुन मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेली सविस्तर माहिती अशी की, “किनगाव बु॥ तालुका यावल येथील राहणारे लिलाधर रातिलाल काटे (वय ३५ वर्ष) हे शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरातून निघूनन गेले होते. यासंदर्भात पोलीस ठाण्यात लिलाधर काटे हा मिळुन न आल्याने हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
आज रविवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शेत शिवारात शोधाशोध घेतली असता किनगाव शिवारातील गोपाळ देवरे यांच्या शेतातील विहीरीत लिलाधर काटे यांचा मृतदेह पाण्यात बुडुन मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आले.
यावल पोलीस ठाण्यात मयताचा चुलत भाऊ रविन्द्र काटे यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. मयत लिलाधर काटे यास दोन लहान मुलं व एक मुलगी, पत्नी, आई, वडील असे कुटुंब आहे.