पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.
निषेध व्यक्त करतांना पाटील यांच्या प्रतिकात्मक फोटोला चपला मारो आंदोलन व साडी, बांगड्या, टिकली लावत जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा योजना पाटील, मा. नगरसेविका सुचेता वाघ, ज्योती वाघ, पाचोरा तालुका अध्यक्ष रेखा देवरे, शहराध्यक्षा सुनिता देवरे, भडगाव शहराध्यक्षा रेखा पाटील, सामान्य न्याय विभाग तालुका अध्यक्षा वैशाली बोरकर, शहराध्यक्षा रेश्मा नवगिरे, आशा जोगी, नम्रता पाटील, शिवानी पाटील, तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, अॅड. अविनाश सुतार, शहर अध्यक्ष अजहर खान, ए. बी. अहिरे, गौरव वाघ, गोपी वाघ उपस्थित होते.
आंदोलनानंतर चंद्रकांत पाटील यांना साडी, बांगड्या व टिकलीचा आहेर पोस्टाने पाठविण्यात आला आहे.