गोलाणी मार्केटमधून दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटमध्ये कामाच्या निमित्ताने आलेल्या आंबेवडगाव ता. पाचोरा येथील तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, इसाक युसूफ पठाण (वय-२८) रा. आंबेडगाव ता. पाचोरा जि.जळगाव हा तरूण चालकाचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना आंबेवडगाव येथे चप्पल विक्री दुकान सुरू करण्याचे असल्यामुळे दुकानात सामान आणण्यासाठी ते त्यांचे मामा अय्युब रहिम पठाण यांची (एमएच १९ बीएल ९९५९) क्रमाकांच्या दुचाकी घेवून इसाक पठाण व त्यांचा मित्र नितीन इंद्रिसिंग निकम  शनिवारी ३१ जुलै रोजी जळगाव निघाले. दुपारी १२.३० वाजता ते जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये आले. त्यांनी त्यांची दुचाकी गोलाणीमार्केटमध्ये लावून मार्केटमध्ये गेले. परंतू शनिवार व रविवार मार्केट बंद असल्याने ते परत दुचाकीजवळ पाचोरा येथे जाण्यासाठी आले. मात्र त्यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दुपारी १ वाजता उघडकीला आले. परिसरात दुचाकीचा शोध घेतला मिळून आला नाही. शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यासाठी सोबत कागदपत्रे नसल्याने ते पाचोरा येथे परत गेले. आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गाडीचे मुळ कागदपत्र घेवून शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश पाटील करीत आहे. 

 

Protected Content