Home क्राईम शेतात विषारी औषध सेवन करून शेतकऱ्याचा दुदैवी अंत !

शेतात विषारी औषध सेवन करून शेतकऱ्याचा दुदैवी अंत !

0
103


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात कामासाठी गेलेल्या एका ५८ वर्षीय शेतकऱ्याचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भडगाव तालुक्यातील वाडे येथे घडली आहे. सुरेश सुदाम महाजन (वय ५८, रा. वाडे, ता. भडगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे गावात सुरेश महाजन हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी सुरेश महाजन हे वाघडी रस्त्याला लागून असलेल्या स्वतःच्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचा लहान भाऊ नेहमीप्रमाणे सुरेश यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. शेतात पोहोचल्यानंतर भावाने आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी शेतातील झोपडीत जाऊन पाहिले असता सुरेश महाजन हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून, सुरेश यांचा मुलगा गोपाल आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खाजगी वाहनाने धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद परदेशी हे करीत आहे.


Protected Content

Play sound