जळगाव (प्रतिनिधी) एक पाच वर्षीय मुलगी घराजवळ खेळत असतांना अनोळखी व्यक्तीकडून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना आज दुपारी शहरातील इस्लामपुरा भागात घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, आज दुपारी एक वाजेच्या सुमारास इस्लामपुरातील आठ नंबर शाळेजवळ एक ५ वर्षीय मुलगी आपल्या अंगणात खेळत होती. त्याच वेळी अरुण ठाकूर (वय 30, रा कांचन नगर) हा दुपारी एक वाजेच्या सुमारास दाराजवळ येऊन संबंधित मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्नात होता. हा प्रकार संबंधित मुलीच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. यानंतर गल्लीतील मुलांनी संशयित आरोपीला पकडून शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत अद्याप पर्यंत शनिपेठ पोलीस आत कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, संशयित हा मनोरुग्ण असल्याचे देखील कळते.