अडचणी लक्षात घेवून टेन्ट व्यवसाय सुरू करण्याची असोसिएशनची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून टेंन्ट व्यवसाय बंद आहेत. शासनाने आमच्या अडचणी लक्षात घेवून नियम आखून व्यवसाय करण्याची संधी द्यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाला केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आम्हाला आत्मदहन शिवाय काहीही पर्याय शिल्लक राहणार नाही अशी माहिती टेन्ट असोसिएशन आणि संलग्नित व्यवसाय बांधवांनी आज १९ मार्च रोजी पत्रकार परिषदे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी दिली.

राज्यात गेल्या १ वर्षापासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय, पार्टी लॉन, टेंट डेकोरेटरर्स, कॅटरर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, लाईट व साऊंड, फोटाग्राफर, वाजंत्री व शहनाई, घोडा व बग्गी, माळा डेकोरेटर्स, डी.जे. ऑर्केस्ट्रा कलाकार, जनरेटर, वेटर, स्टॉल डेकोरटर्स, पुरोहित आदी विविध प्रकारच्या व्यवसायिकांचे पुरवठादाराचे व्यवसाय थप्प झाला आहे. त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २० मार्च पासून हॉल, मंगल कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणावर विवाह तत्सम कार्यक्रमांवर निर्बंध घातल्याने आज उपासमारीची वेळ आली आहे. आणि रोजगार नसल्याने कर्जबाजारी होत आहे. जळगाव जिल्हा मल्टी सर्व्हीसेस प्रायव्हेट असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. शासनाने आमच्या अडचणी लक्षात घेऊन काहीतरी नियम आखून देत व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागाला जाईल व इतर खर्च, कर भरणा करता येईल. सिनेमागृह, नाट्यगृह सुरू आहेत त्यामुळे आम्हाला देखील परवानगी मिळावी अशी विनंती टेंन्ट असोसिएशन आणि संलग्नित व्यवसाय बांधवांनी जिल्हाधिकारी व शासनाकडे केली आहे. शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर आत्मदहन शिवाय काहीही उपाय शिल्लक राहणार नाही, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, संतोष दप्तरी, अजय अग्रवाल, प्रितेश चोरडीया, राजेश नाईक, चंदन अग्रवाल, धिरज दलाल, जयेश खंदार, रूपेश महाजन, नूर बँडचे संजय जगताप, किशोर पाटील, किशोर महाजन, चंद्रकांत महाजन, हेमंत लढे, प्रकाश मुळे यांच्यासह दापोरे मंगल कार्यालय, कमल लॉनचे संचालक आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1377156119332400

https://www.facebook.com/508992935887325/videos/721807661849967

Protected Content