राष्ट्रवादी महिला आघाडी मजबूत करा ; रवींद्र पाटलांचा वंदना चौधरी यांना सल्ला (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी महिला आघाडी नुतन जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी ग्रामीण नेते, आजी माजी पदाधिकारी यांच्या मदतीने चांगली कार्यकारिणी देत जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला संघटना मजबूत कशी होईल यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  महिला आघाडीच्या नूतन जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. रवीद्र पाटील यांनी सांगितले की, वंदना चौधरी यांनी  बुलढाणा जिल्हा येथे निरीक्षकपदी काम केलेले असून त्यांचा अनुभव पाहता त्या अधिक चांगले काम करतील.  वंदना चौधरी यांना ग्रामीण भागाचा दौरा करत असतांना आपले सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. 

त्या  दोन वर्षापासून प्रदेश सचिव पदावर कार्यरत असून बुलढाणा जिल्ह्याच्या निरीक्षकपदी काम पाहिले  आहे  त्यांच्याकडून अनुभवातून जिल्हाध्यक्ष पदाला न्याय देता येईल याकडे माझा कल असणार आहे. कोरोनाबाबत जनजागृती करणार आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे केंद्र सरकराने गॅस, पेट्रोल- डीझेलची केलेली  दरवाढीबाबत वारंवार आंदोलन केली आहेत. ती आंदोलन यापुढेही चालूच राहतील अशी माहिती त्यांनी दिली. कोरोनामुळे ज्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशा महिलांच्या कुटुंबीयांना संजय गांधी निराधार योजेनेचा लाभ कसा मिळवून देता येईल याकडे प्रकर्षाने लक्ष देणार आहे. या महिलांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारकडे  प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षात ५० टक्के महिलांना शरद पवार यांनी आरक्षण दिले असून यानुसार जिल्ह्यातील आगामी निवडनुकांमध्ये सक्षम महिलांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  महिला आघाडीच्या नूतन जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी आजपासून महिला अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला.  या वेळेस जिल्हाध्यक्ष रविन्द्र पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक लाडवंजारी,  अशोक पाटील, सलीम इनामदर,  दिलीप माहेश्वरी, किरण राजपूत, शकीला तडवी, मंगला पाटील, अर्चना कदम, शकुंतलाताई, जुलेखाताई आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/163961842136782

 

Protected Content