यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात गेल्या एक महिन्यापासून शेकडो डुकरांना स्वाईन फ्लू आजारामुळे किंवा कुठल्या तरी धोकादायक आजारामुळे मृत्यु होत आहे. मरण पावलेल्या डुकरांच्या दुर्गधींमुळे यावल येथील नागरीकांना मोठा त्रास सोसावे लागत आहे. दोन दिवसापुर्वी पशु संवर्धन विभागाने वैद्यकीय पथकाने थातुर मातुर चौकशी करुन आजाराचे कोणतेही निष्कर्ष व कारण न शोधता शहरातुन काढता पाय घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चला उधान आले आहे. यावल शहरात मागील एक महिन्यापासुन नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी डूकरांचा स्वाईन फ्लू किंवा दुसऱ्या अज्ञात आजाराने मृत्यु होत असल्याने यावल शहरवासीयांमध्ये आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला चिंतेचे सावट पसरले आहे.
मागील तीस चाळीस दिवसापासुन शहरात मोठया प्रमाणावर स्वाईन फ्लूच्या विषाणुजन्य आजारामुळे किंवा अज्ञात आजारामुळे डुकरांचा मृत्यु होत असुन, नगर परिषद प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मरण पावलेले डुकर उचलण्याच्या पलीकडे काहीच न केल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान दोन दिवसापुर्वी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. संजय धांडे, जळगाव जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी यांच्या पथकाने शहरात एन्ट्री मारली काही जनावरांची तपासणी त्यांनी केल्याचे समजते व काही वरहा पालन करणाऱ्या मंडळीचे जाब जवाब घेऊन ड्रकरांचा मृत्यु नेमका कशामुळे या निष्कर्षा पर्यंत न पोहचता कुठल्या तरी आजाराने डुकरे मरण पावत असल्याची माहिती फोटो सेशन करीत प्रसिद्धी माध्यमाना देऊन पथकाने शहरातुन काढता पाय घेतला आहे. त्यामुळे शहरात मरण पावलेल्या डुकरांचा नेमका मृत्यु स्वाईन फ्लूच्या आजारामुळे की कशामुळे याचे उत्तर मात्र अद्यापपर्यंत वैद्यकीय पथकाकडून मिळु शकले नाही.