मुक्ताईनगर येथे आ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत रविदास महाराज जयंती साजरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । माणसाने माणसासारखे जगले पाहिजे वागले पाहिजे. ही समानतेची भावना प्रत्येक समाज मनामध्ये रुजली पाहिजे. समाजाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी समाजासाठी काय केले पाहिजे ही सामाजिक समतेची भावना प्रत्येक व्यक्तिच्या व समाजाच्या मना मना रुजली पाहिजे .समाज संघटीतपणे राहिला तर समाजाचा विकास होत असतो व संकटे आली तर त्यांना कमी करण्याची धमक सुद्धा त्यात सामावलेली असते. संत महापुरुषांचे विचार घरा घरा पर्यंत पोहचले पाहिजे . चुकीच्या रुढी परंपराना फाटा देऊन विज्ञान वाद स्विकारला पाहिजे. म्हणून संताच्या विचारा सोबतच आधुनिक शिक्षण सुद्धा घेतले पाहिजे. शिक्षणानेच व्यक्तिची सोबतच समाजाचीही प्रगती होत असते असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संत रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती निमित्त व्यासपिठावरून केले.

मुक्ताईनगर येथे संत रविदास नगर येथे चर्मकार समाजाचे संत शिरोमणी श्रध्येय गुरू रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंद्रकात भाऊ पाटील होते तर अध्यक्ष डॉ.भगवान गोरे होते. व्यासपिठावर सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ घुले , सुनिल पाटील, श्री तायडे साहेब अफसर खान, छोटू भाऊ भोई व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी निलेश घुले, कैलास शिर्के, अतुल हिंगोणेकर ,विनोद घुले , राजेश घुले, धिरज घुले , श्री .किरण निंभोरे, प्रवीण जयकर ,दिपक जयकर, कडू घुले , कविता भोंडेकर, रविंद्र दांडगे, राजू घुले, नरेश शिर्के इत्यादी तसेच महिला भगिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतुल हिंगोणेकर यांनी केले तर सुत्र संचालन निंभोरे आणि आभार प्रदर्शन गणेश गोरे सर यानी केले. कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाची लाभ घेतला.

Protected Content