अबब.. ४० बाय ६० फूटाच्या रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील शैलेश कुळकर्णी यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या एम.एल.सी.कविता अक्का यांच्या वाढदिवसानिमित्त २० तासात ४० बाय ६० फुटाची भव्य रांगोळी रेखाटली.

शैलेश कुलकर्णी यांनी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पाचोरा येथील गजानन महाराजांची रांगोळी रेखाटली होती. या रांगोळीला संपूर्ण भारतातून कला रसिकांची दाद मिळाली याच प्रकारे त्यांची थेट तेलंगणा राज्यातील टी. आर. एस. पक्षाचे यूथ लीडर बाबासाहेब प्रसाद साईप्रसाद यांच्याशी ओळख झाली यातूनच त्यांना साई प्रसाद यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या  एम. एल. सी. कविता अक्का यांची वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी रेखाटण्याचे कल्पना सुचली. याच कल्पनेतून सर्वप्रथमच थेट महाराष्ट्र राज्या बाहेर जाऊन तेलंगणा राज्यामध्ये आपली कला सादर करण्याची संधी ‘कला छंद आर्ट’ शैलेश कुलकर्णी पाचोरा व त्यांचे सहकलाकार यांना मिळाली. 

या संधीचे सोने करत त्यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा अक्का यांच्या वाढदिवसानमित्त शैलेश कुलकर्णी (कला छंद आर्ट) १३ मार्च २०२१ या दिवशी हैदराबाद येथे त्यांची भव्य अशी ४० बाय ६० फूट रांगोळी रेखाटली. सलग २० तास एवढा कालावधी ही रांगोळी पूर्ण करण्यास लागला. तसेच तब्बल ५०० किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात रांगोळीचा वापर ही कलाकृती घडविण्यासाठी करण्यात आला. यात पाचोरा येथील स्वतः रांगोळीकार शैलेश कुलकर्णी व सहकारी अजय पाटील, वैभव शिंपी, अजय विसपुते, शुभम पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमावेळी तेलंगणा राज्यातील मंत्रीतसेच इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शैलेश कुलकर्णी तसेच सर्व सहकलाकार यांचे कार्यक्रमावेळी सत्कार करण्यात आला.

Protected Content