पाचोरा आगारात सेवा बजावणाऱ्या २९ महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार (व्हिडीओ)

पाचोरा नंदू शेलकर । पाचोरा आगारात एस. टी. महामंडळाच्या सेवेत तब्बल २९ महिला या सेवा बजावत असुन यात २५ महिला वाहक, ३ महिला ऑफिस क्लार्क तर एक महिला लालपरिच्या देखभाल करण्यासाठी कार्यरत आहे. या  आगार प्रमुख पदी ही महिला आहे. 

आज जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगार प्रमुख निलिमा विजय बागुल, लिपीका निता जाधव, जागृती पाटील, कांता पाटील, महिला वाहक कर्मचारी अर्चना जाधव, योगिता पाटील, रुपाली मोरे, शितल महाजन, रत्नाबाई काळे, सुजाता सुरळकर व महिला सहाय्यक शितल बागुल  उपस्थित होत्या.

प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना आपणास बघावयास मिळतात. याचाच एक अपवाद म्हणुन एस. टी. महामंडळाच्या पाचोरा आगारात तब्बल २९ महिला कार्यरत असुन यामध्ये २५ महिला वाहक, ३ महिला आॅफीस क्लार्क तर एक महिला ही चक्क लालपरिच्या देखभालीचे काम यशस्वीपणे सांभाळत आहे. तसेच आगार प्रमुख पदी निलिमा विजय बागुल या महिलाच असुन महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात महिला ह्या फक्त चुल व मुल न सांभाळता पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना आपणास बघावयास मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाचोरा आगार हे आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/557156751865157

 

Protected Content