मुंबई प्रतिनिधी | नियमांचे उल्लंघन केले म्हणून इतरांवर गुन्हे दाखल होत असतांना वरूण सरदेसाई हा भाचा असल्यानेच त्यांना सूट मिळाली आहे का ? असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
दहीहंडीवरून आता सत्ताधारी आणि मनसेमध्ये सामना रंगल्याचे दिसून येत आहे. राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यातच मनसे पदाधिकार्यांकडून आज ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे बाळा नांदगावकरांसह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाईवरुन गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? असा सवाल देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय.
राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली. मुख्यमंत्री दुसर्यांना सांगतात. मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितलं नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? असे प्रश्न देशपांडे यांनी विचारले आहेत. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, असंही देशपांडे म्हणाले.