फ्लॅट घेण्यासाठी विवाहितेचा छळ; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ येथील माहेर आलेल्या विवाहितेला फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रेहाब राहिल शेख (वय-२२) रा. काट्या फाईल शनीपेठ जळगाव यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील राहिल शेख अब्दुल रऊफ यांच्याशी फेब्रुवारी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती राहिल शेख याने विवाहितेला फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. परंतू विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती गरीबीची असल्याने पैश्यांची पुर्तता करू शकत नाही असे सांगितल्यावर विवाहितेला मारहाण करून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच सारे अब्दुल रऊफ शेख कामोरोद्दिन, नसरीन बी अब्दुल शेख , तौसिफ अब्दुल रऊफ, अमरिन राणी शेख अहमद, अहमद शेख गुलाम महोम्मद, सर्व रा. निडपूरा नगरदेवळा ता. पाचोरा, मेहरूनिसा शेख नियाजोद्दिन, नाजमीन शेख तौफिक रा. मेहरूण जळगाव यांनी वांरंवार पैसे मागून मारहाण केली. खानदान भिकारी है, तेरा मा बाप की औकात नही है, हमे भिकारी समदी मिला असे बोलून गांजपाट केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. सोमवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे. 

 

Protected Content