यंदाचा अर्थसंकल्प आरोग्य व्यवस्थेवर आधारित- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थव्यवस्थेतून आत्मनिर्भर भारताचे दर्शन होत असल्याचे नमूद करत हा अर्थसंकल्प आरोग्य व्यवस्थेवर आधारित असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आजच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, हे बजट आरोग्यव्यवस्थेवर आधारित आहे. आजच्या बजेटमध्ये देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बजेटमधून आत्मनिर्भर भारताचे दर्शन होत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, संधीची समानता हे सूत्र लक्षात घेऊन या बजेटमध्ये महिलांसाठी तरतूद केली आहे.
शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली आहे. याचा शेतकर्‍यांना नक्कीच लाभ होणार आहे. आजच्या बजेटच्या हृदयात गाव आणि शेतकर्‍यांचा विकास असल्याचे ते म्हणाले. तर रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एमएसएमई क्षेत्रासाठी चांगली तरतूद करण्यात आलेली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.

Protected Content