रस्त्यांवरील काटेरी झुडूपे काढण्याने मॉर्निंग वॉक गृपचे मानले आभार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपालिका व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने अखेर मॉर्निंग वॉक ग्रुपने वर्गणी करून दोन किमी रस्त्यावरील काटेरी झुडुपे काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अमळनेर तालुक्यातील पिंपळे रोड ते शासकीय आयटीआय पर्यंतच्या रस्त्यावर अनके बाभळीची झाडे वाढल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर काटे व फांद्या लागत असत. काट्याच्या फांद्या रस्त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त रुंदी व्यापू लागल्याने मोटरसायकल किंवा लहान वाहने जातांना फांद्या चुकवण्यासाठी किरकोळ अपघात होत होते. तसेच गवत व झुडुपे वाढल्याने सकाळ संध्याकाळ फिरायला जाणाऱ्या नागरिकांना साप ,विंचू व विषारी कीटकांची भीती होती. अनेक वेळा मागणी करूनही लोकप्रतिनिधी व नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने अखेर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी स्वतः वर्गणी करून जेसीबीच्या साहाय्याने दोन किमी रस्त्यावरील काटेरी झुडुपे काढल्याने रस्ता मोकळा झाला आहे.

त्यामुळे फिरणाऱ्यांसाठी सोयीचे झाले आहे. यासाठी संजय पाटील , डी.ए. धनगर, लोटन पाटील, विनोद बोढरे, भिका गोसावी, एम एन पाटील, एच आर पाटील, बी यु पाटील, कैलास पाटील, दुर्योधन पाटील, डी एस शिरसाठ, दगडू पाटील, मनोज चव्हाण, विनोद धनगर, भाऊसाहेब लांडगे, झुंबरलाल पाटील, बी ए पाटील, अरुण दाभाडे, सी के जाधव, बोरसे, प्रल्हाद दुसाने, गोपाळ शिसोदे, सचिन लांडगे , मनोज ठाकरे , योगेश , सुनील जाधव , गणेश लांडगे आदींनी सहकार्य केले.

Protected Content