सोशल मीडियावर निवडणूकीच्या तारखा असलेला मजकूर व्हायरल; आयोगाने म्हटले बनावट

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । सध्या सोशल मीडियावर बनावट निवडणूक वेळापत्रकाचे छायाचित्र असलेला मजकूर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. या बनावट निवडणूक वेळापत्रकावर भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाने २४ फेब्रुवारी रोजी स्पष्टच सांगितले की निवडणुकीचे वेळापत्रक व्हॉट्सॲप मेसेजद्वारे नव्हे तर पत्रकार परिषदामार्फत जाहीर केले जाते.

या बनावट पत्रात लोकसभा निवडणूकीचे संपूर्ण वेळापत्रक आहे. या वेळापत्रकामध्ये 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे असे दिसत आहे. या पत्रात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ मार्च दिलेली आहे. २२ मे रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होणार असे या बनावट पत्रात लिहलेले आहे. या वेळापत्रकाच्या मजकूराबाबत निवडणूक आयोगाने एक्स पोस्ट वर लिहिले आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या वेळापत्रकाबाबत सोशल मीडियावर एक बनावट संदेश व्हायरल होत आहे. हा संदेश बनावट आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख जाहीर केलेली नाही. आयोग निवडणूक वेळापत्रक पत्रकार परिषदेमार्फत जाहीर करत असते.

 

Protected Content