भुसावळ, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १७ वी १४ व १९ वर्षांच्या आतील मुला/मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे़. सदर स्पर्धेकरिता जिल्ह्यातील खेळाडूंची निवड रावेर येथे ८ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०: ०० वाजता, सरदारजी शाळेच्या मैदानावर, केली जाणार आहे.
१४ वर्षाकरिता १ ऑक्टोबर २००५ व १९ वर्षाकरिता २००० नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रावेरचे तालुका क्रीडा समन्वयक ए.पी. पाटील, मुख्याध्यापक शिरीष वाणी क्रीडाशिक्षक टी.बी. महाजन, जे.के. पाटील, उन्मेष पाटील, प्रतीक कुलकर्णी यांनी केले आहे.