हातात तलवार-कुऱ्हाड घेऊन दहशत, तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरड करून एकाला तरूणाला मारहाण केली तर हातात तलवार आणि कुऱ्हाड घेवून परिसरात दहशत निर्माण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की मंगल कोळी वय २६ रा. मंगळपूरी, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गोविंदा वामन आंबेकर रा. कोरे नगर, मिल परिसर, धुळे याने विक्की कोळी याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच हातात तलवार आणि कुऱ्हाड घेवून परिसरात शिवीगाळ करत मोठमोठ्याने आरडाओरड करत त्यांला जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोविंदा आंबेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.

Protected Content