दहशतवाद्यांच्या गोळीबारात संघ नेता जखमी

श्रीनगर वृत्तसंस्था । दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात संघाचे नेते चंद्रकांत शर्मा हे जखमी झाले असून त्यांचा अंगरक्षक ठार झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, जम्मू-काश्मिरातील किश्तवाडा येथे आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका रुग्णालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रकांत शर्मा यांना टार्गेट करण्यासाठी हा हल्ला केला असून त्यात संघाचा हा नेता जखमी झाला आहे. या हल्ल्यात त्याचा बॉडीगार्डही ठार झाला आहे. दहशतवादी हे बुरखा परिधान करून आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Add Comment

Protected Content