दहशतवादी संघटनेशी संबंध : पुण्यातून दोन महिला अटकेत

पुणे प्रतिनिधी । दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून पुण्यातील कोंढवा आणि येरवडा भागातील दोन महिलांना एनआयए आणि एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे.

पुण्यातील येरवाडा आणि कोंडवा येथून नाबील सिद्दीकी खत्री (२७ वर्ष) आणि सादिया अनवर शेख (२१ वर्ष) या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. दोन महिलांना अटक केली आहे. दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशयावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही महिला आयएसआयके म्हणजे इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेशी संबध असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलं आहे. या दोन्ही स्लीपर सेलशी संबंधीत होत्या की त्या या संघटनेत सक्रीय होत्या याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, एनआयए आणि एटीएसने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

Protected Content