Home क्राईम इच्छादेवी चौकात भीषण अपघात: सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू

इच्छादेवी चौकात भीषण अपघात: सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू

0
298


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजता एका भीषण अपघातात सायकलस्वार वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. चुकीच्या दिशेने (वन-वे) येणाऱ्या एका अज्ञात ओमनी कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात वसंत प्रताप पाटील (वय-७०, रा. खंडेराव नगर) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची नेमकी घटना
मंगळवारी सकाळी वसंत पाटील हे सायकलने आपल्या घरी परत जात होते. इच्छादेवी चौकात ते पोहोचले असता, समोरून चुकीच्या मार्गाने येणाऱ्या एका ओमनी कारने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वसंत पाटील रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी हनिफा मोमीन यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांचा तपास सुरू; नातेवाईकांचा आक्रोश
या अपघाताची माहिती मिळताच वसंत पाटील यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound