तरूणावरील चाकू हल्ल्यानंतर चोपड्यात तणाव

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात आज एका तरूणावर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर वातावरण नियंत्रणात आले आहे.

चोपडा शहरात आज दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. शहरातील साने गुरूजी कॉलनी भागातील आकाश संतोष भोई या तरूणावर दुपारी एकच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला जळगाव येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर शहरातील बाजारपेठ बंद झाली. तर सायंकाळी दुसर्‍या समुदायातील तरूणावर दगडफेक करण्यात आल्याने तो जखमी झाल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला.

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ कडेकोट बंदोबस्त लावल्याने वातावरण नियंत्रणात आले. या संदर्भात चोपडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वातावरण तणावग्रस्त मात्र नियंत्रणात होते. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Protected Content