जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणीस उत्स्फूर्त प्रतिसाद (व्हिडीओ)

nivad chachani

भुसावळ प्रतिनिधी । नागपूर येथे होणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय १६ वर्षाच्या आतील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड रेल्वे स्कूल मैदानात घेण्यात आली. जिल्हाभरातून १७० खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भारतीय खेल मंत्रालय व स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे मान्यताप्राप्त असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणीस जिल्ह्याभरातील १७० खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट प्रतिसाद दिला. रेल्वे स्कूलच्या मैदानावर तीन सत्रांमध्ये निवड चाचणी संपन्न झाली निवड चाचणीस अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, पारोळा, मुक्ताईनगर तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला निवडलेले खेळाडू नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यात संघाकडून प्रतिनिधित्व करतील

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी- सतीश कुलकर्णी

ग्रामीण भागातील खेळाडू तसेच छोट्या शहरातील खेळाडूंना प्रतिभा, खेळ दाखवायची संधी मिळत नाही. इच्छा असूनही संधी नसल्यामुळे प्रतिभा दाखवणार कुठे? जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटने मार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून खेळाडूंना प्रतिभा दाखवायची एक सुवर्ण संधी असून खेळाडूंनी मेहनत करून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन रेल्वे स्कूलचे उपप्राचार्य सतीश कुलकर्णी याप्रसंगी केले. प्रसंगी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल, रेल्वे स्कूलचे शिक्षक उपाध्याय विद्यापीठ खेळाडू राहुल कोळी, राष्ट्रीय खेळाडू प्रतीक कुलकर्णी, तारिख अहमद, चेतन वानखेडे, विकास पाटील, उदय सोनवणे, शुभम शर्मा, वसीम शेख उपस्थित होते.

Protected Content