शिर्डी वृत्तसंस्था । क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आज परिवारासह दुपारच्या सुमारास शिर्डीतील साईंचे दर्शन घेतले आहे. सचिन साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची माहिती पसरताच, सचिनला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सचिनला सुरक्षा पुरविण्यासाठी पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
सचिन, त्याची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन हे तिघेही आपल्या काही मित्रपरिवारासोबत आज दुपारी खासगी विमानाने शिर्डीत दाखल झाले होते. तब्बल दहा वर्षानंतर सचिन आज शिर्डीत आला होता. त्यानंतर त्यांनी साईमंदिरातील साईंचे दर्शन घेत, साईंची पाद्य पुजाही केली. साईबाबा संस्थानच्या वतीने कार्यकरी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सचिनचा शाल आणि साईंची मुर्ती देऊन सत्कार केला. सचिन शिर्डीत आल्यानंतर साईभक्त तसेच सचिनच्या चाहत्यांनी त्याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.