फैजपूर येथे गुरांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला : दोघे ताब्यात

80d6bd58 0fb0 4eea afa2 43df6397861a

फैजपूर, प्रतिनिधी | येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ यावलकडे नेले जाणारे सुमारे ६० हजार रुपये किमतीचे ६०० किलो गुरांचे मांस पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून डीवायएसपी यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यात मांस वाहून येणारी टाटा मॅजिक गाडी व ६०० हजार रुपये किमतीचा माल असा एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुवारी मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ अजीम खान अजिज खान (रा.कुरेशी मोहल्ला) याने त्याचे साथीदार सुलतान उर्फ कल्लू शेख चांद व याकुब शेख सुगराती दोन्ही राहणार फैजपूर यांच्या मदतीने शहरातील नदीकाठी कापलेल्या गुरांचे मांस यावल येथे शेख रईस याला पोहोचवण्यासाठी टेम्पोद्वारे (क्रमांक एम. एच. १२- ३९४१) २०० लिटरच्या बॅरलमध्ये घेऊन जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रायव्हर अश्पाक शेख युनुस, व अजिम खान अजित खान यांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर चार आरोपी हे फरार झाले आहेत. त्यामध्ये सुलतान उर्फ कल्लू चांदखा, याकुब शेख सुगराती, आसिफ रिक्षावाला रईस (पूर्ण नाव माहित नाही) (सगळे राहणार यावल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पो.कॉ. दिलीप तायडे, शरद शिंदे, शैलेंद्र बनसोडे, किरण चाटे हे करीत आहेत.

Protected Content