टेम्पो आणि महिंद्रा गाडीचा अपघात; तीन मृत्यू, ११ जखमी

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जव्हारमध्ये आयसर टेम्पो आणि महिंद्रा गाडीचा भीषण अपघात झाला. २७ मे रोजी जव्हार- नाशिक मार्गावरील वाळवंडा गावाजवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

तर सात जखमींना पुढील उपचारांसाठी नाशिकमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय आणि तीन जणांना जव्हारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निवृत्ती गणपत पागे, सुंदराबाई निवृत्ती पागे आणि गंगुबाई दशरथ कोरडे अशी मृतांची नावे आहेत. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील रहिवासी महिंद्रा मॅक्स गाडीने विरारच्या जीवदानी देवी मंदिराच्या दर्शनासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Protected Content