Home Cities चोपडा तेली समाज जिल्हाध्यक्षपदी के. डी. चौधरी

तेली समाज जिल्हाध्यक्षपदी के. डी. चौधरी

0
75


चोपडा प्रतिनिधी । तेली समाजच्या जिल्हाध्यक्षपदी के.डी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी अनिल चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. 

तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रियाताई महिंद्रे यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुकदेव वंजारी, युवक आघाडीचे प्रदेश ऊपाध्यक्ष शामकांत ईशी, विक्रांत चांदवडकर यांचे विनंती नुसार महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत जळगाव जिल्हा अध्यक्षपदी चोपडा येथील के. डी. चौधरी यांची सन्मान पूर्वक नियुक्ती करण्यात आली. 

याचवेळी चोपडा येथील ऊद्योगरत्न अनिल मंगल चौधरी यांची जळगाव जिल्हा पश्‍चिम विभाग युवक आघाडीच्या ऊपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. के. डी. चौधरी यांनी सर्व नेते मंडळींचे आभार मानले. अभिनंदन करण्याऱ्या सर्वांचे आभार मानून सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने समाजाची निष्ठेने सेवा करण्याचा संकल्प केला असल्याचे नमूद केले.

 

 


Protected Content

Play sound