बोदवड येथे तहसिलदारांची तात्काळ नेमणूक करावी – आमदार चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड, ता. बोदवड येथे तहसिलदारांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी, अशा मागणीचे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. प्रसंगी सोबत चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते.

आमदार पाटील यांनी आज दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या मतदार संघात तीन तालुके असून बोदवड हा ५२ गावांचा तालुका असून गेल्या पाच ते सहा महिन्यापासून प्रभारी तहसिलदार कार्यभार सांभाळत आहे. त्यामुळे शेतक-यांना शेतीच्या कामांकरिता तसेच विद्यार्थ्याकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्र मिळण्याकरिता वेळ व पैसा वाया जात आहे. विद्यार्थ्याना वेळेवर आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावरही परिणाम होत आहे.

सद्यःस्थिती असलेल्या तहसिलदारांकडे दोन तालुक्यांचा कार्यभार असल्याने वेळेअभावी दोन्ही तालुक्यांना न्याय देता येत नाही. तरी बोदवड, ता. बोदवड येथे कायमस्वरूपी तहसिलदारांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी पत्रात केलेली आहे.

 

Protected Content