यावल एसटी आगाराची दिवाळीत दिड कोटीच्यावर उत्पन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील एसटी आगाराने यंदाच्या दिवाळीच्या कार्यकाळ देखील प्रवासी बस सेवेत जळगाव जिल्ह्यात उत्पन्नात पुनश्च आघाडी घेतल्याचे दिसुन येत असल्याचा विश्वास व्यक्त करीत या संदर्भातील माहीती आगाराचे व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी दिली आहे.

 

या संदर्भात आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी माहीती देतांना सांगितले की, यावलच्या एसटी आगारात एकुण ६२ एसटी वाहन असुन , ११८ चालक आणी १३५ वाहक अशी संख्या आहे . मागील २०२० ते२०२१हे दोन वर्ष कोरोना संसर्गाच्या गोंधळात निघुन गेलीत मात्र २०१९च्या दिवाळी काळात आगाराने १ कोटी५८ लाख१३ हजारावर उत्पन्न मिळवळे , दोन वर्षाच्या काळा नंतर आलेल्या या  र०२२च्या वर्षात कमी वाहनांची संख्या असतांना ही यावल आगाराने दिवाळीच्या कार्यकाळात र१ / १० / २०२ऱ ते१० / ११ / २०२२पर्यंत या विसदिवसाच्या कालावधीत यावल आगाराने १ कोटी६७ लाख ७९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले असल्याची माहीती आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दिली , याशिवाय दोन दिवसापुर्वीच शेगाव येथे संपन्न झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी एकुण ३५बसेस सोडण्यात आली होती यात देखील आगारास६ लाख१० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले असे ही माहीती देतांना त्यांनी सांगीतले , यंदाच्या दिवाळी काळात प्रवाशांसाठी नाशिक , औरंगाबाद , पुणे , शिरपुर , धुळे, सुरत , माहुरगढ आदी लांब पल्याच्या बसेस सोडण्यात आल्यात या उत्पन्नाच्या लक्ष प्राप्ती साठी या सर्व बसेस एकुण ४९०२६८ किलो मिटर एवढी धाव घेतली अशी माहीती आगार व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी दिली यात त्यांनी त्यांचे सहकारी स्थानक प्रमुख जितेन्द्र जंजाळ , एटीआय संदीप अडकमोल वआगाराती सर्व कर्मचाराऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फलीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले .सर्वत्र खाजगी वाहनांचा व अवैद्य प्रवासी वाहतुकीचा गोंधळ असतांना ही यावल आगारात ईतर आगाराच्या तुलनेत कमी बस वाहनाची संख्या असतांन मिळवलेले उत्पन्न हे लक्ष वेधणारे असल्याची प्रतिक्रिया यावल तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांनी दिली असुन त्यांनी आगार व्यवस्थापकाचे विशेष अभिनंदन केले आहे.

Protected Content