श्रध्दा हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आफताबला फाशी द्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   क्रूरकर्मा आफताब पुनवाला याने श्रध्दा वालकर या युवतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे कामकाज फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येऊन क्रूरकर्मा आफताबला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी  छावा मराठा युवा महासंघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

निवेदनात पुढे म्हटले आहे की,  देशभरातील पोलिस स्टेशनमध्ये युवती व महिला हरविलेबाबत नोंद झालेल्या केसेसवर देखील गांभीर्याने उचित कार्यवाही करणेसंदर्भात  संबंधितांना उचित निर्देश देण्यात यावे व भारतातील महिला व युवती बेपत्ता होण्यामागे काही षडयंत्र आहे किंवा कसे याविषयी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांचेकडे जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील  यांच्यामार्फत निवेदन देऊन करण्यात आली.  तसेच आफताब व याप्रकारे महिला व युवतींसाठी कर्दनकाळ असणाऱ्या प्रवृत्तींचा जाहिर निषेध करण्यात आला. याप्रसंगी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , किरण ठाकूर , उज्वल पाटील, भीमराव सोनवणे , ज्ञानेश्वर मिस्तरी , आकाश निकम , प्रांजल नेमाडे, कृष्णा जमदाडे , सागर मोतीराडे , रवी सोनवणे आदी उपस्थित होते.

 

Protected Content