डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

38d488e7 5913 4e33 a6b9 d5d08a6b0afd

 

मुंबई (वृत्तसंस्था) डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आज लोकसंघर्ष मोर्चातील शिष्ट मंडळाने डॉ.पायलच्या आई-वडिलांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रशासन तुमच्या मागे खंभीरपणे उभे असून यातील दोषींना पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशी कठोर शिक्षा करू. तसेच या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे देत असल्याची घोषणी देखील केली.

नायर हॉस्पिटल समोर लोकसंघर्ष मोर्चाने दि.28 मे रोजी विविध जनसंघटनांसोबत धरणे आंदोलन करून पायलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अंकिता खंडेलवाल,हेमा आहुजा व भक्ती मेहेर यांना तात्काळ अटक करा व या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कडक शासन करावे, अशी मागणी केली होती. यावेळी आरोग्य शिक्षण मंत्री ना.गिरीश महाजन यांनी भेट देऊन कोणालाही माफ केले जाणार नाही व दोषींना कडक शासन करू असे आश्वासन दिले होते. याचा पाठपुरावा करत लोक संघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज दि 30 मे रोजी डॉ. पायल यांच्या आई वडिलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली व त्यांच्या सोबत सुमारे 25 मिनिटे चर्चा केली. डॉ पायल यांच्या आईनेही सर्व तपशील सांगून माझ्या मुलीला न्याय दया, म्हणून आपले दुःख मांडले. यावेळी मा. मुख्यमंत्री यांनी आस्थेने सर्व घटनाक्रम समजून घेतला व घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत आम्ही सर्व मंत्री व प्रशासन तुमच्या मागे खंभीरपणे उभे असून यातील दोषींना पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशी कठोर शिक्षा करू, असे आश्वासन दिले. तसेच प्रतिभा शिंदे यांनी मागणी केल्या प्रमाणे सदर घटनेचा तपास हा क्राईम ब्रांचकडे सोपवत असल्याचेही सांगितले.

 

या प्रकरणी न्यायालयातही चांगल्यातले चांगले वकील नेमत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या सर्व प्रकरणी आरोग्य शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा करून माझ्या जिल्ह्यातल्या लेकीला न्याय मिळवून देईल, असे सांगत सहकार्य केले. यावेळी डॉ.पायल यांच्या आई अबिदा तडवी, वडील सलीम तडवी तसेच जळगावचे रामेश्वर नाईक, सरिता माळी व वंदना पाटील उपस्थित होत्या.

Add Comment

Protected Content