गोदिंया-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गोंदिया जिल्हयात महसूल विभागातून मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया जिल्हयातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे आणि नायब तहसीलदार नागपूरे आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गोरेगाव तहसील कार्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर सर्व संशयित आरोपींना गोंदिया येथे पुढील कारवाईसाठी कार्यालयात आणण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील एका फिर्यादीने तक्रार दिली होती. दिलेल्या या तक्रारीनुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार दिली होती. यात गोरेगावचे तहसीलदार किशन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नामक एक खाजगी व्यक्तीचा समावेश आहे. हे प्रकरण उघडकीस येताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. यामुळे गोरेगावसह जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.