नायगाव येथून अज्ञात चोरट्यांकडून बैलाची चोरी; गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील नायगाव येथील राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या खळयात बांधलेल्या बैलजोडीतील एका महागड्या बैलाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात त्या अज्ञात पशुधनचोरटया विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कि राजेन्द्र रघुनाथ पाटील (वय-५६ वर्ष) रा. नायगाव ता. यावल या शेतकऱ्याच्या गावाबाहेर डोंगरी रस्त्यालगत असलेल्या खळ्यातील बैलजोडी सुमारे २५ हजार रूपये किंमतीच्या एक बैल ८ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या पुर्वी कुणीतरी अज्ञात भामट्यांने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या बाबत शेतकरी राजेन्द्र रघुनाथ पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने त्या अज्ञात पशुधन बैल चोरणाऱ्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. वासुदेव मराठे हे करीत आहे . दरम्यान यावल तालुक्यातुन मागील काही दिवसांपासुन शेतकऱ्यांच्या पशुधनचोरीच्या झाल्याचे दिसुन येत आहे.

Protected Content