ते बाप-बेटे तुरूंगात जाणारच : राऊतांचा पुन्हा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तुम्ही घोटाळा केला नाही तर मग जामीनासाठी धावपळ का करताय ? असा सवाल उपस्थित करत ते बाप-बेट तुरूंगात जाणारच असा इशारा खासदार संजय राऊत यांनी आज दिला आहे. सोमय्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी आज पुन्हा जोरदार टीकास्त्र सोडले.

आता तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा. आय रिपीट मेक माय वर्ड, असा इशाराच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच बाप-बेटे तुरुंगात जाणारच आहेत. तुम्ही घोटाळा केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी का धडपड करत आहात?, असा सवालच राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना नाव न घेता केला. ते मीडियाशी बोलत होते.

आर्यन खान प्रकरणाचं सत्यबाहेर आलं आहे. तुम्ही किती मोठं अवडंबर तयार केलं होतं. शाहरुखचा मुलगा म्हणून, मोठं नाव म्हणून तुम्ही अवडंबर तयार केलं. बनाव केला. आमच्याबाबतीतही तेच केलं. आता मी आलोय. तुम्ही तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही पराजित होणार आहात, असं संजय राऊत म्हणाले.

बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत. ते मी पहिल्यापासून बोलत आहे. पीएमसी घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. खंडणीची प्रकरणं आहेत. आतापर्यंत ते दाबलेले होते. हळूहळू बाहेर येत आहेत. बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का पळत आहेत? आतापर्यंत पळापळ होत नव्हती. जेव्हापासून मी भ्रष्टाचार बाहेर काढला तेव्हापासून बाप-बेटे दारोदार फिरत आहेत. अटकपूर्व जामिनासाठी या कोर्टातून त्या कोर्टात जात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी का अर्ज करत आहात? तुम्ही काहीच केलं नाही ना? मग एवढी धावपळ कशासाठी. हे बाप बेटे आणि काही लोक जे मोठमोठ्या गप्पा मारतात. आतापर्यंत इतरांना धमक्या देत होते. याला जेलमध्ये पाठवू त्याला पाठवू. मग तुम्ही जामिनासाठी अर्ज का करत आहात?, असा सवाल त्यांनी केला.

Protected Content