स्मिताताई वाघ यांच्या विजयासाठी तरुण केदारनाथ चरणी नतमस्तक

 

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जवखेडे येथील नवतरुण श्री केदारनाथ भगवान यांच्या दर्शनासाठी गेले आहेत त्यानी आज केदारनाथ येथे श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या लोकसभेच्या विजयासाठी साकडे घातले.

तरुणांनी उत्साह आणि भक्तीने श्री केदारनाथ भगवानाची पूजा केली आणि स्मिताताई उदय वाघ यांच्या विजयासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी कैलास पाटील यांनी म्हटले की, श्रीमती स्मिताताई वाघ या एक निष्ठावान आणि समर्पित नेत्या आहेत. त्यांनी नेहमी समाजाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम केले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की त्या लोकसभेच्या निवडणुकीत निश्चितच विजयी होतील.असा विश्वास व्यक्त करून तरुणांनी श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

यावेळी कैलास पाटील,गणेश पाटिल संकेत लांडगे, मयुर गोसावी, कल्पेश पाटील, गिरीष खलाणे आणि संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content