तरसोद येथे धावत्या रेल्वेखाली एकाची आत्महत्या

tarsod news

जळगाव प्रतिनिधी । चटई कंपनीतील कामगाराने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बनारसी काशी राजभर (वय-28) रा. चाकदैया ता.कसैय्या जि. कुशीनगर (उत्तरप्रदेश) हा तरसोद शिवारातील इंको चटाई कंपनीत गेल्या दोन महिन्यांपासून काम करतो व तेथेच राहतात. बनारसी हा विवाहित असल्याने त्याला मुलगा झाल्याने तो गावाकडे उत्तरप्रदेशात 15 दिवसांपुर्वी गेला होता. गावाहून सोमवारी तरसोद येथील चटाई कपंनीत हजर झाला. मंगळवारी रात्री 8 वाजता जेवन करून त्याने औषध घेतले. दरम्यान, रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांना चंटाई कंपनीतून पलायन केले. ही बाब त्याच्या मित्रांना माहित पडल्यानंतर त्यांनी त्याचा रात्रभर शोधाशोध सुरू केला तर मिळून आला नाही. दरम्यान सकाळी 6 वाजेच्या सुमारास तरसोद शिवारातील रेल्वे खंबाक्रमांक 426 / 25 – 27 जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content