जळगाव प्रतिनिधी । तलवार व चॉपने तिघांवर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याप्रकरणातील चौथा आरोपीला पकडण्यास शनीपेठ पोलीसांना यश आले. शुभम उर्फ भैय्या गोविंद सोनवणे असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, मोहम्मद अनस सलीम बागवान, इरफानशा युसुफशा आणि अतीकखान हमीदखान हे तिघेजण 18 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मोटारसायकलने पाळधी येथून घरी जात असतांना शहरातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळून जात असतांना संशयित आरोपी आकाश मुरलीधर सपकाळे (वय-19), गणेश रविंद्र सोनवणे (वय-19), दिपक सुकलाल सोनवणे (वय-19), अक्षय उर्फ लल्ला संजय सोनवणे, विक्की अरूण चौधरी, शुभम उर्फ भैय्या गोविंद सोनवणे वय -22, अण्णा राठोड सर्व रा. कांचन नगर यांच्यासह तीस ते चाळीस जणांनी एकत्र येवून तिघांना तलवार आणि चॉपरने वार करत जखमी केले होते. याप्रकरणी शनी पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आकाश सपकाळे, गणेश सोनवणे आणि दिपक सोनवणे या तिघांना आगोदर अटक करण्यात आले होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी शुभम उर्फ भैय्या गोविंद सोनवणे याला अटक केली आहे. तर उर्वरित अद्याप फरार आहे.
विशेष बाब म्हणजे, आरोपी शुभम उर्फ भैय्या गोविंद सोनवणे हा लाडू गृपचा अध्यक्ष आहे. जळगावात लाडू गृपचे जवळजवळ 200 सदस्य आहे. शहरात या गृपच्या माध्यमातून शहरात दादागिरी, दहशत निर्माण करत आहे. त्यांच्या गृपमधील सदस्याचा वाढदिवस असला तर शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर्स आणि होर्डीग लावले जातात. या गृपमध्ये साधारणपणे 17 ते 19 वयोगटातील तरूण सदस्य आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही.डी. ससे, दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, योगेश बोरसे करीत आहेत.