



चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी गावाजवळ भरधाव वेगाने धावणार्या कारने दुचाकीला उडविल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव येथून नांदगाव या दिशेने दोन पुरूष, एक महिला आणि एक बालिका जात होते. दरम्यान, तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल नक्षत्रच्या पुढे एका भरधाव वेगाने धावणार्या स्वीफ्ट कारने या दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरील चारही जण ठार झाले असून कारमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोन जण जागीच ठार झाले असून एक रूग्णालयात नेतांना तर एक उपचार सुरू झाल्यानंतर मृत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांच ओळख पटल नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक संपत अहिरे यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली आहे.


