हंबर्डी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । तालुका स्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन हंबर्डी तालुका यावल येथे आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ हंबर्डीचे प्रा. एस जे पाटील होते कार्यक्रमाच्या प्रसंगी गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले, यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या वैज्ञानिक उपक्रमांचा एक संधी म्हणून वापर करावा व जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन यश मिळवण्याचा प्रयत्न करावा असे विचार मांडले. त्याचबरोबर समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्रीमती मोहनमाला नाझीरकर तहसीलदार यावल यांनी उपस्थिती दिली त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी  विश्वनाथ धनके, शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर ,मुख्याध्यापक संघाचे तालुक्याचे अध्यक्ष जयंत चौधरी होते. प्राथमिक गट, माध्यमिक गट, आदिवासी,शिक्षक गटातून एकंदरीत ७८ उपकरणे सदर करण्यात आली.

या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर  यांनी स्वीकारले, त्यांनी आपल्या भाषणात  विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बरोबर सादरीकरणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. धनंजय शिरीष चौधरी यांनी कार्यक्रम प्रसंगी विज्ञान प्रदर्शनात भेट देऊन विद्यार्थ्यांना सतत अध्ययनशील  राहण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यावल तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष किरण झांबरे, सचिव सुधीर चौधरी तसेच, जिल्हा शिक्षक पतपेढी चे संचालक सिद्धेश्वरजी वाघुळदे , यावल तालुक्यातील केंद्रप्रमुख, सहसमन्वयक सचिन भंगाळे, भूषण वाघूळदे यावल तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, यावल तालुक्यातील विज्ञान शिक्षक, जागृती विद्यालय हंबर्डी चे सर्व संचालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक तथा विज्ञान मंडळ अध्यक्ष डॉ नरेंद्र महाले यांनी तर आभार मुख्याध्यापक आर डी पवार यांनी मानले.

विज्ञान प्रदर्शनाच्या प्रसंगी परीक्षणाचे कामकाज श्रीमती वैशाली इंगळे, श्रीमती किरण महाले, हेमंत पाटील पराग पाटील, नितीन बारी, एच जे नेहते, डॉ नरेंद्र महाले, सचिन भंगाळे यांनी केले.

स्पर्धक विजेते- प्राथमिक गट प्रथम-हर्षिता सचिन बुरुजवाले (सरस्वती विद्यामंदिर, यावल)

द्वितीय-मोहित हितेंद्र झांबरे,(न्यू इंग्लिश स्कुल भालोद,)

तृतीय-अजय विनोद लोढे, (प्रभात विद्यालय, हिंगोणा तालुका यावल)

उत्तेजनार्थ-१)मुग्धा प्रसाद काळवीट,(एल एम पाटील विद्यालय, राजोरे)

२)रुचिका प्रकाश बोरोले,जे टी महाजन इंग्लिश मिडियम, फैजपूर

माध्यमिक गट यातुन प्रथम क्रमांक कुणाल भूषण भोळे,न्यू इंग्लिश स्कुल,भालोद,द्वितीय देवल डीगंबर इंगळे,भारत विद्यालय, न्हावी तृतीय-हरजित राजेश जैन,आदर्श विद्यालय,दहिगाव

उत्तेजनार्थ १)डिगंबर विकास सपकाळे, एल एम पाटील विद्यालय, राजोरे,२)भुराभाई सुखाभाई बोलीया जागृती विद्यालय, हंबर्डी आदिवासी माध्यमिक प्रथम-मोसीन लालखा तडवी (शासकीय आश्रमशाळा, वाघझिरा ) प्राथमिक शिक्षक गट,

प्रथम सलमा राजू तडवी (सेकंडरी एज्युकेशन, प्राथमिक शाळा, भालोद)

माध्यमिक शिक्षक गट प्रथम- गजानन अशोक सुरवाडे(माध्यमिक विद्यालय, न्हावी तालुका यावल .

तालुक्यातील विविध वैज्ञानिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन संशोधन वृत्ती ही वाढीस लागत आहे आणि यातून विद्यार्थी हा वैज्ञानिक विचारांची पेरणी करीत आहे. उद्या आपल्या तालुक्यातून वैज्ञानिक घडतील याची ही सुरूवात आहे असे मनोगत मार्गदर्शन करतांना

विश्वनाथ धनके-गटशिक्षणाधिकारी, यावल यांनी व्यक्त केले .

Protected Content