जनता हायस्कूल नेरी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर व जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने जनता हायस्कूल येथे ३ सप्टेंबरला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.

कोरोना कालखंडानंतर तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देत उच्च प्राथमिक गटातील ८६ तर माध्यमिक गटातील ४२ विद्यार्थ्यांनी तर चार शिक्षकांनी सहभाग नोंदवला  .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव वर्षा पाटील तर उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर जि.प.सदस्या विद्या खोडपे, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर ए लोहार, गटविकास अधिकारी व्ही एम सनेर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरोदे, एन एफ चौधरी शालेय पोषण आहार अधिक्षक विष्णू काळे सर्व केंद्रप्रमुख, संचालक अनिरुद्ध पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष गोपाल पाटील, नेरी विद्यालय मुख्याध्यापक आर ए पाटील, पर्यवेक्षक एस एन पाटील, एन बी पाटील तसेच सर्व  विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा. असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सनेर यांनी तर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल गटशिक्षणाधिकारी लोहार यांनी कौतुक केले. उद्घाटक दिलीप खोडपे तसेच  कार्यक्रमाच्या अध्यक्ष वर्षा पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास बालवैज्ञानिक घडू शकतात. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षकांनी परिश्रम घेतले  .

उच्च प्राथमिक गटातून प्रथम डिंपल कोळी ( जि प शाळा एकुलती बुद्रुक  ), द्वितीय बोहरा सेंट्रल स्कूलचा राहुल शर्मा तर तृतीय पळासखेडे विद्यालयाच्या सागर हिवाळे

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून प्रथम प्रियश वालदे ( श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी ), द्वितीय शेंदुर्णी गरुड विद्यालयाची ऐश्वर्या जगदाळे तर तृतीय क्रमांक सामरोद विद्यालयाचा तेजस शेळके याने प्राप्त केला. मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी शेतीविषयक राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन बारामती येथे तालुक्यातील प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त रा आ महाजन शाळेचा विद्यार्थी मयूर बोरसे व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. नुकताच जाहिर झालेल्या जि.प आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जामनेर तालुक्यातून किर्ती बाबुराव घोंगडे यांची निवड झाली. यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रशांत वाघ यांनी केले.

Protected Content